" आगळा वेगळा Valentine "
माझ्या एका चुलत भावाच लग्न होत म्हणून मला गावाला जाव लागल. गावाला जायचा प्रवास मला खूप आवडतो. पण यावेळचा प्रवास खूप डोकेदुखीचा होता कारण bus मध्ये बिघाड झाला आणि bus खूप लेट झाली. सकाळी गावाला पोहचलो. गाव आणि माझ खूप जवळच नात आहे, कारण माझ जन्मठिकाण हेच आहे. आई वाडीलांपेक्षा जास्त प्रेम करणारे आजी आजोबा आहेत. त्यांना सोडून कधी परत यायचा विचारसुद्धा मनात येत नाही.
लग्न असल्यामुळे खूप दिवसांनी संपूर्ण family एकत्र आली होती. भावाच लग्न पार पडल्यानंतर आम्ही रात्री घरी आलो, आणि लगेच झोपून गेलो. प्रवासाची थकथक आणि लग्नातील धगधग यामुळे दमलो होतो खूप. सकाळ कधी झाली कळलच नाही. सकाळी उठल्या उठल्या आजीने माझ्या आवडीचा शिरा बनवून दिला तो खाल्ला आणि फेरफटका मारायला गेलो.
भावांसोबत cricket kabaddi लपंडाव खेळण्यात दंग झालो. खूप दिवसांनी काकांसोबत गप्पा मारल्या मज्जा मस्ती केली, माझे दोन्ही काका मित्रासारखेच आहेत त्यांच्याशी मी खूप काही share करतो. हे सगळ चालू असताना college मध्ये days चालू आहेत हे विसरलोच होतो.
गावाला आमचा कुत्रा ज्याच नाव काळू आहे तो आणि आमच्या घराची आन बाण शान आणि माझी जान म्हणजे आमची गाई 'पैठण' हे दोन्ही मला आजी आजोबांसारखे खूप प्रिय आहेत. ते प्राणी नसून घरातले सदस्य आहेत, specially आमची गाई ती खरच खूप lucky आहे आम्हाला. आम्ही जे बोलतो ते तिला सर्व समजत. तिला व बाकीच्या गुरांना चारायला नेने त्यांना खायला टाकणे त्यांना पाणी देणे हे माझं गावच प्रमुख काम आहे. गावी गेल्यावर मी गुराखीच बनतो. पण मला हे सर्व खूप आवडत. मला जर कधी एकटेपणा वाटला तर मी पैठणकडे जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो आणि सर्वकाही तिच्याशी share करतो, ती पण ऐकत असते कधी डोळ्याच्या पापण्या हलवून तर कधी मान हलवून मला प्रतिसाद देत असते.
अशा आनंदाच्या वातावरणात Valentine's day कधी निघून गेला कळलच नाही. Valentine म्हणजे आपला प्रिय असाच असावा, या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तीस भेटतो त्याच्यासाठी भेटवस्तू घेतो तिच्याशी मनसोक्त प्रेमाच्या गप्पा मारतो, अगदी असच काही माझ्यासोबत घडल होत. सर्व प्रेम करणारी जिवाभावाची माणस सोबत होती, त्यांच्यासोबत खूप मज्जा केली, आजी आजोबांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या माझ्या गाईसोबत वेळ घालवला आणि महत्वाचं म्हणजे माझ्या आवडीच्या ठिकाणी मी होतो. अजून काय पाहिजे खास valentine. तर असा होता माझा "आगळा वेगळा valentines day."
Khup chan 👌👍
ReplyDeleteअसाही एक Valentine day खुप छान 👌👌
ReplyDelete👌👌 वाह
ReplyDelete👌👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteछ
ReplyDelete