सोळाव वरीस धोक्याच...
एकेकाळी या गाण्याने लहान मूल ते म्हातारी माणस यांना वेड लावल होत. लहान असताना अनेक लोकांच्या तोंडातून हे गाणं ऐकल होत. सोळाव वर्ष म्हणजे एखाद्या मुला मुलींच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो.. मूल मुली खऱ्या अर्धाने या वयात मोठी झालेली असतात. मुलगी मोठी झाली की मुलीच्या घरातल्यांना तिच्या लग्नाची घाई लागलेली असते. पण खरंच या किंवा याच्या पेक्षा कमी वयात मुलींना समज आलेला असतो का? मुलींचे आई वडील समाजाच्या भितीपोटी आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करतात. ते एका समस्येचे निवारण करण्यासाठी बालविवाहाची दुसरी समस्या निर्माण करतात किंवा त्यास खतपाणी घालतात.
भारतात 54 % बालविवाह होतात. म्हणजे लग्न करणाऱ्या मुली अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नसतात. राजकीय नेत्यांच्या दृष्टीने लुप्त होत चाललेली पण समाजाच्या भीतीने काही प्रमाणात प्रकट होत असलेली समस्या म्हणजे बालविवाह. आजच्या काळात बालविवाह सारख्या घटना घडतात हे समीकरण न जुळणारे आहे. एकीकडे आपण स्त्री पुरुष समानता, स्त्री शक्ती असे नारे लावतो पण दुसरीकडे त्याच स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली करत आहोतच. मुलींचे जरा कुटे अंग दिसायला लागले की सर्व समाज तिचा दुश्मनच होतो. लोक तिच्यावर नजरेने बलात्कार करतात. याच भीतीमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसली आणि त्यात कामावणार एक आणि खाणारे जास्त असले की मुलीला एखादे स्थळ जरी आल तर लगेच लग्न लावून टाकतात. एवढी जड झाली आहे का मुलगी ?
बालविवाहाचे प्रमाण खेड्यापाड्यात जास्त आहे कारण खेड्यापाड्यात लोक गाव समाज आणि गावकी यामध्येच अडकला आहे. पण हास्यास्पद गोष्ट म्हणजे शहरातील काही भागात बालविवाह होतो. शिक्षित लोकांनी अशा कृत्यास सहकार करणे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आपल्या मुलीने कोणत्या मुलासोबत लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले नाही पाहिजेत असे प्रत्येक आईबापाला वाटत. जर असे झाल्यास त्यांना समाजात तोंड दाखवायची जागा राहत नाही, असा गोड गैरसमज लोकांनी मनात बाळगला आहे.
मातीच्या कच्चा घड्यामध्ये पाणी ओतल तरतो घडा फुटण्याची भीती असते, हे सर्व लोकांना माहीत आहे. मग आपल्या कोवळ्या मुलीच इतक्या कमी वयात लग्न लावायला कसे काय तयार होतात. मुलींचे हक्क डावलण्याचा चांगला पर्याय निवडला आहे पुरुषप्रधान समाजाने तो म्हणजे बालविवाह.