Sunday, 1 April 2018

स्वतःची वाह वाह

                कोणीतरी आपल नाव respect ने घ्याव अस प्रत्येकाला वाटत असते. पण हे आजच्या जगात फार अल्प प्रमाणात दिसून येते. शिव्या आणि चिडवणे अशी हाक मारण्याची मित्रांची पध्दत असते तर रागाने बोलण्याची आई बाबांची पध्दत असते. पण या दोन्हीतही प्रेम दडलेल असत. माणसाला मनोमनी वाटत असते आपल्याला कोणीतरी चांगल बोलाव आपली तारीफ करावी वाह वाह करावी असा वाटणं काही चुकीचे नाही. अशी दुनियेची रीत आहे आणि त्यातलाच मी एक.

              लहान पणापासून फिरण्याची आवड असल्याने मुंबईतील बरीच ठिकाणे, रस्ते परिचित आहेत. नुकताच 10 वी passout झालो होतो. Admission साठी धावपळ सुरू होती. शाळेच्या मित्रांसोबत भायखळा येथील साबू सिद्दीन technical college बघायला गेलो होतो. College मध्ये inquiry केली आणि तेथून बाहेर पडलो. बाजूला एका ठिकाणी नाश्ता केला. प्रत्येक जण आपापल्या college दुनियेची स्वप्न रंगवण्यात busy झाला होता.

              तेथून आम्ही निघालो मला पप्पांकडे जायचे होते, मित्रांना taxi मध्ये बसवले आणि bus stop वर गेलो. नागपाडा bus stop वरून 124 bus पकडली. 124 bus म्हणजे डबल डेकर. पण ही Bus नेहमीच late असायची त्यामुळे bus मध्ये गर्दी ही खूप होत असत. त्यादिवशी ही गर्दी खूप होती. त्या bus च्या भल्या मोठ्या दरवाज्याच्या दाराच्या एका कोपऱ्यात उभा राहिलो. Bus पुढच्या stop वर थांबली तेव्हा अजून काही लोक Bus मध्ये चढले. त्यात एक वृद्ध महिला होती. आत जायला तिला जागा मिळत नव्हती,  म्हणून ती समोर उभी राहिली. अचानक bus ने speed वाढवला त्यात मुंबईचे रस्ते म्हणजे रस्ता कमी आणि खड्डे जास्त. अशाच एका खाद्यमधून bus चे चाक गेले. सर्वांना दचकाच बसला. तेव्हा त्या वृद्ध महिलेचा तोल गेला ती बाहेर पडणारच होती माझे लक्ष तिच्याकडे असल्याने तिचा हात जोरात पकडला व आत खेचले.

               बसमधील सर्व लोकांनी हा प्रकार पहिला. ती महिला खूप घाबरली होती. पडली असती तर नक्कीच डोक गेल असत याची जाणीव तिला झाली होती. अशा अवस्थेत तिने रे मेरा सलमान खान बोलली. अजून काहीतरी बोलत होती पण तिचा आवाज बारीक झाला होता. बसमधील प्रवाशांनी तिला आत जायला जागा दिली. आत जाता जाता तिने smile दिली. ती smile काहीही न बोलता बरच काही सांगणारी होती. तिच्या डोळ्यात ती करुणा जाणवत होती.

               तात्पर्य एवढच की आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी respect ने बघितल होत आणि प्रेमाने बोलल होत. आणि ते पण सलमान खान त्यामुळे हा प्रसंग आयुष्यातील विलक्षण कक्षण राहील. म्हणूनच तर कधीतरी स्वतःची लाल करावी, चांगल वाटत मन  satisfied तरी होत. नाहीतर दुनिया काय नाव ठेवायला आणि वाईट बोलायला आहेच.....

Wednesday, 21 March 2018

सोळाव वरीस धोक्याच

सोळाव वरीस धोक्याच...
             एकेकाळी या गाण्याने लहान मूल ते म्हातारी माणस यांना वेड लावल होत. लहान असताना अनेक लोकांच्या तोंडातून हे गाणं ऐकल होत. सोळाव वर्ष म्हणजे एखाद्या मुला मुलींच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो.. मूल मुली खऱ्या अर्धाने या वयात मोठी झालेली असतात. मुलगी मोठी झाली की मुलीच्या घरातल्यांना तिच्या लग्नाची घाई लागलेली असते. पण खरंच या किंवा याच्या पेक्षा कमी वयात मुलींना समज आलेला असतो का? मुलींचे आई वडील समाजाच्या भितीपोटी आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करतात. ते एका समस्येचे निवारण करण्यासाठी बालविवाहाची दुसरी समस्या निर्माण करतात किंवा त्यास खतपाणी घालतात.

              भारतात 54 % बालविवाह होतात. म्हणजे लग्न करणाऱ्या मुली अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नसतात. राजकीय नेत्यांच्या दृष्टीने लुप्त होत चाललेली पण समाजाच्या भीतीने काही प्रमाणात प्रकट होत असलेली समस्या म्हणजे बालविवाह. आजच्या काळात बालविवाह सारख्या घटना घडतात हे समीकरण न जुळणारे आहे. एकीकडे आपण स्त्री पुरुष समानता, स्त्री शक्ती असे नारे लावतो पण दुसरीकडे त्याच स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली करत आहोतच. मुलींचे जरा कुटे अंग दिसायला लागले की सर्व समाज तिचा दुश्मनच होतो. लोक तिच्यावर नजरेने बलात्कार करतात. याच भीतीमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसली आणि त्यात कामावणार एक आणि खाणारे जास्त असले की मुलीला एखादे स्थळ जरी आल तर लगेच लग्न लावून टाकतात. एवढी जड झाली आहे का मुलगी ?

             बालविवाहाचे प्रमाण खेड्यापाड्यात जास्त आहे कारण खेड्यापाड्यात लोक गाव समाज आणि गावकी यामध्येच अडकला आहे. पण हास्यास्पद गोष्ट म्हणजे शहरातील काही भागात बालविवाह होतो. शिक्षित लोकांनी अशा कृत्यास सहकार करणे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आपल्या मुलीने कोणत्या मुलासोबत लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले नाही पाहिजेत असे प्रत्येक आईबापाला वाटत. जर असे झाल्यास त्यांना समाजात तोंड दाखवायची जागा राहत नाही, असा गोड गैरसमज लोकांनी मनात बाळगला आहे.

               मातीच्या कच्चा घड्यामध्ये पाणी ओतल तरतो घडा फुटण्याची भीती असते, हे सर्व लोकांना माहीत आहे. मग आपल्या कोवळ्या मुलीच इतक्या कमी वयात लग्न लावायला कसे काय तयार होतात. मुलींचे हक्क डावलण्याचा चांगला पर्याय निवडला आहे पुरुषप्रधान समाजाने तो म्हणजे बालविवाह.

Sunday, 18 March 2018

'विश्वास' गेला पानिपतावर

               विश्वास शब्द बोलायला किती सोपा आहे पण या शब्दाचे महत्व खूप मोठे आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास गेला पानिपतावर हे वाक्य लहानपणापासून ऐकत आलो आहे. इतिहासामध्ये पानिपत च्या लढाईचा भागही होता. पण ते आता आठवत नाही, पण अजूनही ते वाक्य सारख कानोकाणी पडत. त्यातच पानिपत चित्रपटाचा teaser पहिला. तेव्हापासून पानिपतच्या लढाई बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.

                पानिपत हे हरियाणा राज्यातील एक प्रमुख शहरआहे. या ठिकाणी आत्तापर्यंत तीन लढाई झाल्या आहेत. पहिली लढाई 1526 ला बाबर आणि दिल्ली सलतनत चा सरदार इब्राहिम लोदी यांच्यात झाली. या लढाईत बाबर ने विजय मिळवला आणि भारतावर मुघलांचे वर्चस्व सुरू झाले. पानिपत चि दुसरी लढाई 1556 ला अकबर आणि हेमू यांच्यात झाली. हेमू हा मुघल सेनापती होता पण अल्पवयीन अकबर ला राजसिंघणावर बसलेलं त्याला आवडल नाही म्हणून हेमू ने बंड पुकारला. या लढाईत हेमू ला जिंकता आले नाही.

                 पानिपत ची तिसरी आणि महत्वाची लढाई म्हणजे कमकुवत झालेले मुघल आणि मराठा. कमजोर मुघलांनी अफगाणी बादशहा अहमद अब्दाली (दुराणी) याची मदत घेतली. 14 जानेवारी 1761 लढाई सुरू झाली. मराठ्यांचे सैन्य तीन तुकडीत विभागले होते पाहल्या तुकडीत विठ्ठल विंचूरकर यांचे सैन्य होते. दुसऱ्या तुकडीत हुजरत चे सैन्य म्हणजे भाऊसाहेब विश्वासराव इब्राहिम खान जनकोजी शिंदे तुकोजीशिंदे आणि बाजीराव मस्तानी ची मुलगा समशेर बहादूर अशा लोकांसोबत फौज होती आणि तिसऱ्या तुकडीत म्हाळराराव होळकर आणि महादजी शिंदे यांची सिंथिया  फौज होती.

                 अब्दाली चे सैन्य ही तीन तुकडीत विभागले होते. पहिल्या तुकडीत रोहिल्ला आणि गारदी दुसऱ्या तुकडीत अब्दाली स्वतः भल्या मोठ्या फौजेसोबत होता आणि तिसऱ्या तुकडीत नजीब खान आणि सुजोध्याय यांचे सैन्य होते. हुजरत ची सेना अब्दाली वर भारी पडली होती, पण ऐनवेळी विंचूरकरच्या च्या सेनेने सत्तेच्या हव्यासापोटी चुकीच्या मार्गाने पुढे गेले. त्यातले काही मारले गेले आणि काही पळाले. अशातच विश्वासरावांना गोळी लागली त्यात भर म्हणजे होळकर आणि सिंथिया लढाईत उतरलेच नाहीत त्यांनी माघार घेतली त्यामुळे हुजरत ची सेना तितर बितर झाली. यामुळे मराठयांचा पराभव झाला. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत मराठ्यांचे जिंकणे तय होते. अब्दाली ने अगदी क्रूर पणे मराठ्यांची कत्तल केली. या दिवशी 30 हजार पेक्षा जास्त सैनिक मारले गेले, एकाच दिवशी इतके लोक मारले गेले अशी ही इतिहासातील पहिलीच लढाई होय.

                अब्दालीने 90 हजार महिला आणि मुलांना बंदिस्त केले. काही लोकांना त्याने बलुचिस्तानला सोबत नेले. ते लोक बलुचिस्तानचे मराठे वंशज म्हणून ओळखले जातात. दिल्लीची सत्ता फक्त मराठेच सांभाळू शकतात असे वक्तव्य ही अब्दालीने केले होते.
काही वर्षानंतर महादजी शिंदे यांनी परत उत्तरेकडील राज्यांवर चढाई केली व राज्यकारभार केला. त्यांच्या पुढील पिढ्यानी राज्य केले.

                 आज हरियाणा राज्यात 200 पेक्षा जास्त गावांमध्ये मराठी वंशज लोक आहेत. त्यांची लोकसंख्या 5 लाख पेक्षा जास्त आहे. या लोकांना हरियानामध्ये रोड मराठे म्हणून ओळखले जाते. रॉड मराठे प्रामुख्याने शेती करतात. महाराष्ट्रातील शेकऱ्यांच्या तुलनेत रोड समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या समाजातील लोकांची आडनावे मराठी आडनावांप्रमाणे आहेत.

                मराठा हा भारतातील पहिला समाज आहे जो राज्य करण्यासाठी बाहेर जाऊन लढला.
असा आहे पानिपत चा इतिहास.

Wednesday, 14 March 2018

"आगळा वेगळा valentine"

" आगळा वेगळा Valentine "

               माझ्या एका चुलत भावाच लग्न होत म्हणून मला गावाला जाव लागल. गावाला जायचा प्रवास मला खूप आवडतो. पण यावेळचा प्रवास खूप डोकेदुखीचा होता कारण bus मध्ये बिघाड झाला आणि bus खूप लेट झाली. सकाळी गावाला पोहचलो. गाव आणि माझ खूप जवळच नात आहे, कारण माझ जन्मठिकाण हेच आहे. आई वाडीलांपेक्षा जास्त प्रेम करणारे आजी आजोबा आहेत. त्यांना सोडून कधी परत यायचा विचारसुद्धा मनात येत नाही.

                 लग्न असल्यामुळे खूप दिवसांनी संपूर्ण family एकत्र आली होती. भावाच लग्न पार पडल्यानंतर आम्ही रात्री घरी आलो, आणि लगेच झोपून गेलो. प्रवासाची थकथक आणि लग्नातील धगधग यामुळे दमलो होतो खूप. सकाळ कधी झाली कळलच नाही. सकाळी उठल्या उठल्या आजीने माझ्या आवडीचा शिरा बनवून दिला तो खाल्ला आणि फेरफटका मारायला गेलो.

               भावांसोबत cricket kabaddi लपंडाव खेळण्यात दंग झालो.  खूप दिवसांनी काकांसोबत गप्पा मारल्या मज्जा मस्ती केली, माझे दोन्ही काका मित्रासारखेच आहेत त्यांच्याशी मी खूप काही share करतो. हे सगळ चालू असताना college मध्ये days चालू आहेत हे विसरलोच होतो.

                गावाला आमचा कुत्रा ज्याच नाव काळू आहे तो आणि आमच्या घराची आन बाण शान आणि माझी जान म्हणजे आमची गाई 'पैठण' हे दोन्ही मला आजी आजोबांसारखे खूप प्रिय आहेत. ते प्राणी नसून घरातले सदस्य आहेत, specially आमची गाई ती खरच खूप lucky आहे आम्हाला. आम्ही जे बोलतो ते तिला सर्व समजत. तिला व बाकीच्या गुरांना चारायला नेने त्यांना खायला टाकणे त्यांना पाणी देणे हे माझं गावच प्रमुख काम आहे. गावी गेल्यावर मी गुराखीच बनतो. पण मला हे सर्व खूप आवडत. मला जर कधी एकटेपणा वाटला तर मी पैठणकडे जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो आणि सर्वकाही तिच्याशी share करतो, ती पण ऐकत असते कधी डोळ्याच्या पापण्या हलवून तर कधी मान हलवून मला प्रतिसाद देत असते.

               अशा आनंदाच्या वातावरणात Valentine's day कधी निघून गेला कळलच नाही. Valentine म्हणजे आपला प्रिय असाच असावा, या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तीस भेटतो त्याच्यासाठी भेटवस्तू घेतो तिच्याशी मनसोक्त प्रेमाच्या गप्पा मारतो, अगदी असच काही माझ्यासोबत घडल होत. सर्व प्रेम करणारी जिवाभावाची माणस सोबत होती, त्यांच्यासोबत खूप मज्जा केली, आजी आजोबांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या माझ्या गाईसोबत वेळ घालवला आणि महत्वाचं म्हणजे माझ्या आवडीच्या ठिकाणी मी होतो. अजून काय पाहिजे खास valentine. तर असा होता माझा "आगळा वेगळा valentines day."

Monday, 12 March 2018

'Digi' शाप की वरदान

'Digi' शाप की वरदान
             शाळेत असताना विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लिहायला लागायचा. प्रत्येकाने यावर लिहले असेल, किंवा प्रत्येकाने याचा विचार नक्कीच केला असेल . पण digi अर्थात digital ते शाप आहे की वरदान याचा आपण प्रत्यक्षात कधी विचारच केला नसेल. Be Digital किंवा digital हो असे शब्द प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतात.
              Digital या शब्दाचा अर्थ न समाजण्यासारखा आहे कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. Digitalया शब्दाची ताकद इतकी मोठी आहे की राजकीय पक्ष digital बनाएंगे अशी आश्वासने देऊन election जिंकतात सुद्धा. माझ्या मते digital म्हणजे internet च्या माध्यमातून उत्पन्न झालेलं आधुनिक तंत्रज्ञान होय. ज्याच्या साहाय्याने सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.Digital ने सर्व क्षेत्रात आपला जोम धरला आहे.
              माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डिजिटल च्या आहारी गेलेला असतो. वेगवेगळ्या कारणांसाठी तो digital चा वापर करत असतो. जसे की, branded वस्तू वापरणे, प्रवासकरिता vehicle book करणे त्यादरम्यान smart phone वर बातम्या वाचणे, गाणी ऐकणे, सिनेमा पाहणे, chatting करणे, plastic Money म्हणजेच credit card debit card चा वापर करणे, आता त्यापेक्षा आधुनिक म्हणजे online व्यवहार करणे त्यामध्ये खरेदी विक्री किंवा पैसे पाठवणे, सिनेमाची तिकिटे book करणे अशी कितीतरी नगण्य कामे digital मुळे सोपी झाली आहेत. यामुळे माणसाचा अमूल्य वेळ बचावला जातो. म्हणूनच digital ला पसंती दिली जात आहे. Digital चा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या जवळपास सर्वच कामे होतात, त्यामुळे digital हे मानवाला लाभलेलं वरदान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
                पण असं म्हणतात ना एखादी गोष्ट जास्त केली की आपल्याला हानी पोहचू शकते, अगदी तसच आहे digital च. Digital मुळे आधुनिक जगात क्रांती घडली आहे, पण हीच क्रांती जगाचा ऱ्हास ही करू शकते.
                Digital मुळे सर्वच गोष्टी सोप्या झाल्या आहेत त्यामुळे माणूस हा दिवसेंदिवस आळशी होत चालला आहे. पूर्वी लहान मुले क्रीडांगण उद्याने यामध्ये खेळताना दिसायची पण आत्ताची मुले video game, play station, laptop, smart phone वर game खेळतात.  त्यामुलांचा दृष्टिकोन बदलला आहे. या मुलांमध्ये आजार वाढत चालले आहेत जसे की कमी दृष्टी आणि लठ्ठपणा.
                Digital मुळे दुरावलेल्या व्यक्ती जवळ आल्या आहेत मात्र जवळच्या व्यक्ती दूर हिताना चे चित्र दिसू लागले आहे. आज प्रत्येकजण आपापल्या कामात इतका गुंतला आहे की त्याला आजूबाजूला काय चालू आहे हे माहीत नाहीये. माणसातला संवाद कमी होत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, आज एका घरात राहणाऱ्या व्यती कित्येक दिवस बोलत नाहीत याला कुठेतरी digital जबाबदार आहे. पूर्वी प्रवासादरम्यान सर्वांच्या गप्पा रंगायच्या आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे प्रत्येकाच्या कानात earphones असतात आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला असतो. ही एक प्रकारच्या धोक्याची घंटाच समजावी. त्यामुळे digital हा शाप तर नाही ना हा प्रश्न उपस्थिती होतो...
तुम्हाला काय वाटत याबद्दल प्रतिकिया कळवा...
धन्यवाद..

Thursday, 1 February 2018

थोर तुझे उपकार

             प्रेम माया आपुलकी जिव्हाळा राग आणि लाड या जगात माणसाला हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी माणसाला फक्त आईकडूनच मिळत असतात (काही अपवाद वगळता).खर तर आई या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आत्मा आणि इ म्हणजे ईश्वर असा होतो. पण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आई या शब्दाचा अर्थ लावत असतो. आई या व्यक्तीच जग हे तिच्या मुलापासून सुरू होत आणि त्या मुलापर्यंत खऱ्या अर्थाने संपत असते म्हणूनच आईला जननी म्हणून ओळखले जाते.
             सासर साठी माहेरचा त्याग केलास पती आणि मुलांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलास आणि संसाराची गाडी ओढलीस. कास करावं तुझ्या या त्यागाचे कौतुक याचे उत्तर कधी मिळणार नाही.
बालपण किती सुंदर होते काहिजरी झालं तरी हळूच तुझ्या कुशीत येऊन सगळ विसरायला व्हायचं तरुणपणात या अंधुक जगात आलोय मात्र खरं पण या जगाची खरोखर भीती वाटू लागलेय, क्षणोक्षणी ह्या जगातल्या जाणिवांचे भय इथले संपत नाही.
             शाळेत जाताना खूप भीती वाटायची, त्यावेळी बाबा खूप मारायचे तेव्हा तुझ्या पदरामागे लपण्यात किती थारा वाटायचा. आता office ला नायचे नसेल तर resignation letter चा मार नक्कीच बसेल असा आत्मविश्वास नक्कीच आहे. तू नसशील जेव्हा कोण पाठीशी घालेल मला? याच विचारानं अंग थरथर कापायला लागत बग.
             शाळेत मस्ती केल्यामुळे principal सरांनी तुला शाळेत बोलवायचे त्यांच्यासमोर ओरडण्याचं नाटक करणे, प्रत्येक सणाला माझ्या आवडीचे पदार्थ बनविणे, नवनवीन कपडे खरेदी करणे, कॉलेजला जाताना हळूच बाबांच्या खिशातून पैसे काढून देणे, कॉलेज मध्ये लफडी केली असता घरी बाबांचा चोप बसणार हे माहीत असूनसुध्दा मध्ये पडून माझी बाजू घेणे, तुझे ते हळवं अस रागावणं त्यातून माझे ते रुसवे फुगवे मग मला जवळ करून मायेने समजावणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहेत.
              बघता बघता कधी मोठा झालो कळले नाही , तुझ्या या पाखराला पंख कधी फुटले कळलेच नाही. झेप घ्यायला आकाशात तयार आहे बघ, ठरवलंय आता कितीतरी अडथळे आले तरीही थांबणार नाही आणि क्षितिजापर्यंत गेल्याबिगर राहणार नाही.
               धन्य झालो तुझ्या पोटी जन्मलो आता जीवन सार्थक करण्याची वेळ आहे.....

Tuesday, 30 January 2018

हम किसी से कम नही

        गेल्या वर्षी आपल्या वाचनात किंवा आपल्या कानी मॅच हरली पण मने जिंकली असे शब्द नक्की पडले असतील. हे वाक्य बहुतांश लोकांच्या आवडीच्या विषयाशी म्हणजे आवडीच्या खेळविषयी आहे. तो खेळ म्हणजे क्रिकेट, जुलै महिन्यात पार पडलेल्या icc विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाला. हे सर्वांना माहीत आहे. पण यानंतर इंग्लंड येथे icc महिला विश्वचषक स्पर्धा पार पडली. हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
        या स्पर्धेविषयी कित्येक लोकांना चाहूल सुद्धा नव्हती. महिला खेळाडूंकडून चांगला खेल होईल खेल होईल याची अपेक्षा कोणी केली त्याला देवच जाणे. पण जस जसे सामने पार पडले, तास तसे भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून प्रतिसाद मिळू लागला. भारतीय महिला संघाची उत्तम कामगिरी देश पाहू लागला. पण या आधी कधीही या खेळाडूंना कोण ओळखत असेल असे मोजण्याइतके लोक  असतील.
         स्त्री म्हणजे चूल आणि मूल असहज प्रथा होती. पण कालांतराने स्त्री पुढे येऊ लागली, अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करू लागली. पण समाजात असे काही कपाळ करंठक लोकही आहेत ज्यांना स्त्रियांच्या यशामुळे त्रास होतो अशा सर्व लोकांना प्रतिउत्तर होत ते म्हणजे ही टूर्णामेंट.
         भारतीय महिला संघ फायनलमध्ये काय पोहचला तोच सर्व भारतीयांच्या आशा त्यांच्याकडे आल्या. म्हणजे भारतीय क्रिकेट चाहते कप ची आशा खेळाडूंकडून करू लागले. पण अशीच आशा जर आधीपासूनच आपण खेळाडूंकडून ठेवली असती तर भारतीय महिला संघाचा दबदबा आख्या जगात निर्माण झाला असता. असो पण भारतीय महिला खेळाडूंनी सर्वांची मने मात्र जिंकली असे सर्वांचे मत आहे.
          प्रश्न असा उपस्थित होतो या महिला खेळाडूंचे स्थान आता भारतात नक्की कुठे आहे. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी म्हणजे सर्व सोयी सुविधा वेळेवर पुरविल्या जातील का?कारण आता त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे. पुरुषांच्या Ipl प्रमाणे महिला ipl खेळविण्यात येईल का? ज्याने करून महिलांना क्रिकेट खेळण्यासाठी महिलांना नवीन व्यासपिठ उपलब्ध होईल, कित्येक नवोदित महिला क्रिकेटर आपली छाप उमटवतील. जर नाही खेळविण्यात आली तर का नाही खेळविण्यात येईल? की महिला खेळाडू अजूनही आपल्याला सिद्ध करण्यात कमी पडत आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत. याची उत्तरे प्रत्येक महिला खेळाडूंना मिळणे आवश्यक आहे.
          कधी का होईना महिला खेळाडूंवर सर्वांचे लक्ष गेले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन आता सामान्य न राहता खडतर झाले आहे. सरकारने महिला क्रिकेटवर जास्त भर देण्यात यावा कारण यांची पात्रता लोकांना न समजण्यापेक्षा खूप मोठी झाली आहे.