कोणीतरी आपल नाव respect ने घ्याव अस प्रत्येकाला वाटत असते. पण हे आजच्या जगात फार अल्प प्रमाणात दिसून येते. शिव्या आणि चिडवणे अशी हाक मारण्याची मित्रांची पध्दत असते तर रागाने बोलण्याची आई बाबांची पध्दत असते. पण या दोन्हीतही प्रेम दडलेल असत. माणसाला मनोमनी वाटत असते आपल्याला कोणीतरी चांगल बोलाव आपली तारीफ करावी वाह वाह करावी असा वाटणं काही चुकीचे नाही. अशी दुनियेची रीत आहे आणि त्यातलाच मी एक.
लहान पणापासून फिरण्याची आवड असल्याने मुंबईतील बरीच ठिकाणे, रस्ते परिचित आहेत. नुकताच 10 वी passout झालो होतो. Admission साठी धावपळ सुरू होती. शाळेच्या मित्रांसोबत भायखळा येथील साबू सिद्दीन technical college बघायला गेलो होतो. College मध्ये inquiry केली आणि तेथून बाहेर पडलो. बाजूला एका ठिकाणी नाश्ता केला. प्रत्येक जण आपापल्या college दुनियेची स्वप्न रंगवण्यात busy झाला होता.
तेथून आम्ही निघालो मला पप्पांकडे जायचे होते, मित्रांना taxi मध्ये बसवले आणि bus stop वर गेलो. नागपाडा bus stop वरून 124 bus पकडली. 124 bus म्हणजे डबल डेकर. पण ही Bus नेहमीच late असायची त्यामुळे bus मध्ये गर्दी ही खूप होत असत. त्यादिवशी ही गर्दी खूप होती. त्या bus च्या भल्या मोठ्या दरवाज्याच्या दाराच्या एका कोपऱ्यात उभा राहिलो. Bus पुढच्या stop वर थांबली तेव्हा अजून काही लोक Bus मध्ये चढले. त्यात एक वृद्ध महिला होती. आत जायला तिला जागा मिळत नव्हती, म्हणून ती समोर उभी राहिली. अचानक bus ने speed वाढवला त्यात मुंबईचे रस्ते म्हणजे रस्ता कमी आणि खड्डे जास्त. अशाच एका खाद्यमधून bus चे चाक गेले. सर्वांना दचकाच बसला. तेव्हा त्या वृद्ध महिलेचा तोल गेला ती बाहेर पडणारच होती माझे लक्ष तिच्याकडे असल्याने तिचा हात जोरात पकडला व आत खेचले.
बसमधील सर्व लोकांनी हा प्रकार पहिला. ती महिला खूप घाबरली होती. पडली असती तर नक्कीच डोक गेल असत याची जाणीव तिला झाली होती. अशा अवस्थेत तिने रे मेरा सलमान खान बोलली. अजून काहीतरी बोलत होती पण तिचा आवाज बारीक झाला होता. बसमधील प्रवाशांनी तिला आत जायला जागा दिली. आत जाता जाता तिने smile दिली. ती smile काहीही न बोलता बरच काही सांगणारी होती. तिच्या डोळ्यात ती करुणा जाणवत होती.
तात्पर्य एवढच की आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी respect ने बघितल होत आणि प्रेमाने बोलल होत. आणि ते पण सलमान खान त्यामुळे हा प्रसंग आयुष्यातील विलक्षण कक्षण राहील. म्हणूनच तर कधीतरी स्वतःची लाल करावी, चांगल वाटत मन satisfied तरी होत. नाहीतर दुनिया काय नाव ठेवायला आणि वाईट बोलायला आहेच.....